पिंपरी : अष्टविनायक दर्शनासाठी वल्लभनगरहून विशेष गाड्या | पुढारी

पिंपरी : अष्टविनायक दर्शनासाठी वल्लभनगरहून विशेष गाड्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामधून संकष्ट चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी शहरातील भाविकांसाठी गुरुवार (दि. 13) रोजी सकाळी सात वाजता राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बसची सोय करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद पाहता, वल्लभनगर आगारातून आणखी एका बसची सोय केली आहे. याचा लाभ सर्व गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केले आहे.

पुणे शहरातून अष्टविनायक दर्शनासाठी शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड आगारामधून दोन विशेष बसची सोय केली होती; मात्र काही दिवसांतच प्रवाशांचा प्रतिसाद पाहता सर्व जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुन्हा वल्लभनगर आगार व शिवाजीनगर येथून आणखी एका बसची सोय केली आहे.

दोन्ही विषेश गाड्या किमान दोन ते तीन मिनिटांच्या फरकाने सकाळी 7 वा. धावणार आहेत. दर्शनाचा कालावधी दोन दिवसांचा असून, महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुखांनी केले आहे.

Back to top button