दावडी येथे ई-पीक पाहणीस सुरुवात | पुढारी

दावडी येथे ई-पीक पाहणीस सुरुवात

निमगाव दावडी; पुढारी वृत्तसेवा: शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मोबाईल अ‍ॅपची माहिती व प्रशिक्षण तलाठी एस. व्ही. शेळके यांच्याकडून देण्यात आले. हे पीक पाहणी अ‍ॅप दर हंगामात शेतकरी पीक विमा, कृषी, बँक व सोसायटी कर्ज, पीक नुकसानभरपाई तसेच शेतीपूरक सर्व योजनांसाठी उपयुक्त पडणार आहे.

तसेच, पीक पाहणी करताना सर्व वाडी-वस्तीवर पोटखराब वर्ग 1 मधील क्षेत्र जमीनधारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्रात घेणेबाबतच्या परिपत्रकाबाबत माहिती देण्यात आली व कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आले. पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करून घेण्याबाबत देखील या वेळी मार्गदर्शन करण्यात आले व अपूर्ण माहिती भरलेल्या अर्जदार यांची ऑनलाइन माहिती तलाठीस्तरावर भरून घेतल्याने अनेक खातेदारांचे लाभ सुरू झाले.

Back to top button