पिंपरी : कर्जाची परतफेड करूनही पैशांसाठी धमकी | पुढारी

पिंपरी : कर्जाची परतफेड करूनही पैशांसाठी धमकी

पिंपरी : सावकारी करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना बांधकाम व्यवसायिकाला सहा लाख रुपये 10 टक्यांनी देऊन तब्बल 27 लाख 60 हजार रुपये वसूल केले; तसेच जबरदस्तीने नोटरी करून तीन प्लॅट नावावर करून घेतले. ही घटना 2015 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथे घडली. पोलिसांनी बेकायदा सावकारी करणार्‍या दीपक वाल्मिक सूर्यवंशी (35, रा. चिंचवड) याला अटक केली आहे. या प्रकरणी सचिन प्रकाश ढवळे (40, रा, आकुर्डी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.8) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 2015 मध्ये आरोपीकडून 10 टक्के व्याजाने सहा लाख रुपये घेतले होते. आरोपीने फिर्यादीकडून जबरदस्तीने बँकेच्या चेकद्वारे, आरटीजीएस, एनएफटीद्वारे असे एकूण 27 लाख 60 हजार रुपये घेतले. तसेचे फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे असलेले देहुगाव येथील बांधकाम साईटमधील तीन प्लॅट जबरदस्तीने आरोपीने नोटरी करून नावे करून घेतले. शिवाय व्याजाचे पैसे न देण्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button