स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे मांजरीत नागरिकांची गैरसोय | पुढारी

स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे मांजरीत नागरिकांची गैरसोय

मांजरी; पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तातडीने मांजरी बुद्रुक येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून मिळावी, अशी मागणी मांजरी येथील नागरिकांच्या वतीने शाम पाटोळे यांनी केली आहे. मांजरी बुद्रुक माळवाडी भागातील एकूण 16 स्वच्छालय आहे. यामधील महिलांचे आठ व पुरुषांचे आठ शौचालय आहेत. गेली वर्षभरापासून या शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती झाले नाही.

शौचालयाचे दरवाजे व भांडी पूर्णपणे तुटलेले आहेत. स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने स्वच्छता करून मिळावी. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक यांना वारंवार सांगूनही, या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात आम्ही मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने सहाय महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. परंतु, अजूनही दखल घेतलेली नाही. आठ दिवसांमध्ये शौचालयाची तातडीने दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी पाटोळे व सदानंद आरण, धनंजय कांबळे, सुनील लोंढे, सचिन जाधव, बंडू जाधव यांनी केली आहे.

Back to top button