बावडा : उजनीतून भीमेत 11 हजार 600 क्युसेक विसर्ग | पुढारी

बावडा : उजनीतून भीमेत 11 हजार 600 क्युसेक विसर्ग

बावडा; पुढारी वृत्तसेवा: पुणे परिसरात पाऊस सुरू झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा बुधवारी (दि. 6) दुपारी 2.30 वाजेपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी 6 वाजता उजनीतून भीमेत एकूण 11 हजार 600 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेली तीन-चार दिवसांपासून उजनीतून भीमेत सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग बंद होता. मात्र, बुधवारी दुपारी 2 वाजता पुन्हा 5 हजार क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर, त्यात सायंकाळी 6 वाजता वाढ करून तो 10 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. परिणामी, भीमा नदीचे पात्र पुन्हा पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहे.

धरणामध्ये 6 वाजताचा पाणीसाठा हा 123.28 टीएमसी एवढा प्रचंड असून, धरण 111.28 टक्के क्षमतेने भरलेले आहे. उजनी धरणामध्ये दौंड येथून येणार्‍या पाण्याचा विसर्ग हा 5 हजार 319 क्युसेक एवढा आहे. सध्या उजनी धरणातून होणारा विसर्ग 10 हजार क्युसेक व वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे 1 हजार 600 क्युसेक असे एकूण 11 हजार 600 क्युसेक क्षमतेने पाणी नदीपात्रातून सायंकाळी 6 वाजेपासून वाहत आहे. उजनीच्या वरील बाजूकडील पुणे परिसरातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग हा वाढविण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने भीमा नदीकाठच्या इंदापूर व माढा तालुक्यातील गावांना सतर्कचा इशारा दिला

Back to top button