मोरगाव : मयुरेश्वराच्या पालखीची तब्बल साडेचौदा तास मिरवणूक, पारंपरिक, ऐतीहासीक राजेशाही दसरा उत्साहात | पुढारी

मोरगाव : मयुरेश्वराच्या पालखीची तब्बल साडेचौदा तास मिरवणूक, पारंपरिक, ऐतीहासीक राजेशाही दसरा उत्साहात

अशोक वेदपाठक

मोरगाव : अष्टविनायकाचे आद्य तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे श्री मयूरेश्वराच्या दसरा सीमोल्लंघनासाठी निघालेल्या राजेशाही, ऐतिहासिक व सामाजिक एकतेचे प्रतीक असणाऱ्या दिमाखदार व अभूतपूर्व राजेशाही पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. ही मिरवणूक तब्बल साडेचौदा तास चालली.

श्री मयुरेश्वरच्या मंदिरात सीमोल्लंघनापुर्वी प्रक्षाळपुजा पहाटे ४ वाजता संजय धारक व चंद्रशेखर धारक यांच्या हस्ते झाली. ७.३० वाजता ढेरेची पुजा व सकाळची धुपारती, दुपारी ३ वाजता रत्नजडित राजेषाही पोषाख पुजा अथर्व धारक, ओंकार गाडे, ऋत्विक धारक, प्रथमेश गाडे, गौरव गाडे यांनी केली. धुपारती आणि विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा पंचारती आणि धुपारतीची विशेष सेवा चंद्रशेखर धारक यांनी दिली. रत्नजडित राजेशाही पोषाखातील श्री मयुरेश्वराच्या मुर्तीच्या गाभाऱ्यात भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. श्री मयूरेश्वराची पालखी मंदिराबाहेर येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शोभेच्या तोफांची सलामी तसेच फटाके व शोभेच्या दारुची आतषबाजीत पालखी राजेशाही थाटात बुधवारी रात्री ७.४५ वाजता निघाली.

दरम्यान मंदिरातून पालखी बाहेर निघताना अनेक गणेशभक्त पालखी ओलांडण्यासाठी दुतर्फा बसलेले पाहावयास मिळाले. पालखीच्या अग्रभागी पाच मानाच्या तोफा, त्यानंतर पाच सनई चौघड्याच्या बैलगाड्या होत्या. त्यामागे राजेशाही पालखी निघाली. पालखीसोबत अब्दागिरी छत्र्या, चवऱ्या असा लवाजमा होता. पालखीचे नियोजन व मार्गदर्शन पुजारी किशोर वाघ यांनी केले. यात ग्रामस्थ, तरुणाई, जय गणेश तरुण मंडळ, सोनोबा ग्रुप तरुण मंडळ यांनी विशेष सेवा दिली होती.

पालखी मार्गावरून बारामती-जेजुरी मार्ग, सिद्धार्थनगर, ब्राह्मण आळी, सोनबा मंदिरात आपटा पूजन दिलिप वाघ व अन्य ब्रह्मवृंदांनी केले. धनगरवाडा ग्रामपंचायत चिंचेची बाग मारुती मंदिर, महादेव मंदिर येथे आरत्या होऊन पालखी मुख्य पेठेतून दुसऱ्या दिवशी गुरूवारी सकाळी १०.४५ वाजता मंदिरात पाेहाेचली. मानाची गोसावी मंडळी, गुरूव मंडळी यांनी पंचारती ओवाळून आरती केली. गुरुवारी सकाळी १० वाजता पालखीचे सीमोल्लंघनानंतर मंदिरात आगमन झाले. मंदिरात पालखी आल्यावर पारंपारिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यात आले. गणेशभक्तांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले.

या सोहळ्यामध्ये सरपंच निलेश कदारी व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र जगताप तसेच सर्व सुरक्षा रक्षक, विजय ढोले, शारदा ढोले, पोपट ढोले, नारायण जाधव, सिध्देश्वर जाधव, केदारी बंधु, हनुमंत गायकवाड, सचिन ननावरे, धनंजय पवार, विशाल पवार, सुरज व आशिष जाधव, सुरेश पवार, अभिजित पवार,आविष्कार पवार, विशाल लव्हटे, रविंद्र भापकर, अशोक तावरे, संदिप तावरे, अजिंक्य तावरे, वैभव तावरे, पोपट ढोले, मनिषा ढोले, कपिल कुलथे, मनिषा जगदाळे, नवनाथ जगादाळे, दामोदर पालवे, सतिश पालवे, अजय पालवे, राहुल पालवे, किरण पालवे, सचिन पालवे, महेश जाधव, छबन जाधव आदींनी सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वडगाव निंबाळकरचे पोलीस निरीक्षक रवींद्र मोहरकर, सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे, सलीम शेख योगेश शेलार, पोलीस अंमलदार संदीप लोंढे, वसंत वाघुले, तुषार जैनक, पोलिस पाटील नयना नेवसे, सहाय्यक दादा नेवसे, बारामती, सुपा, माळेगाव येथील पोलिस अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तोफखान्याचे सर्व सेवेकरी, चौघडावाले, नगारावाले, हिलाल वाले, पंखे वाले, छत्रिवाले, राजदंड चव्हाण मंडळी भालदार चोपदार, हलगीवाले, दारुवाटप भारत सासवधे व मुले, सर्व मान्यवर यानी सीमोल्लंघनसाठी विशेष सहकार्य केले.

Back to top button