पिंपरी : रहाटणीत पाऊण लाखाची घरफोडी | पुढारी

पिंपरी : रहाटणीत पाऊण लाखाची घरफोडी

पिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातून 70 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेएकच्या कालावधीत शिवराजनगर, रहाटणी येथे घडली. अशोककुमार राजेंद्र प्रजापती (34, रा. शिवराजनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेएकच्या कालावधीत बंद होते.
दरम्यान, या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून 70 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले.

Back to top button