महाळुंगे पडवळ : लम्पीमुळे 2 गाई मृत्युमुखी

महाळुंगे पडवळ : लम्पीमुळे 2 गाई मृत्युमुखी
Published on
Updated on

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: साकोरे गाडेपट्टी येथील शेतकरी कृष्णदास कोंडिभाऊ गाडे यांच्या दोन दुभत्या गाई लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने शुक्रवारी (दि. 30) मृत्युमुखी पडल्या. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. म्हस्के यांचे उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तलाठी अश्विनी गोरे, ग्रामसेवक वनवास वासनिक, विश्व हिंदू परिषदेचे तालुका उपाध्यक्ष गणेश गाडे, उपसरपंच श्रुतिका गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ गाडे, माजी सरपंच तुकाराम गाडे, कोतवाल गणेश मोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी कृष्णदास गाडे यांनी दिली. रानामध्ये फिरणार्‍या जनावरांना मोठ्या प्रमाणात तापसदृश्य आजार दिसून येत आहे. त्याचबरोबर तपासणी केली असता, लम्पी आजाराची लक्षणे दिसून आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी जयप्रकाश पाचपुते यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महाळुंगे पडवळ, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, चास, कळंब आदी भागांत मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या जनावरांचे लसीकरण राहिले आहे, अशा शेतकर्‍यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. जयप्रकाश पाचपुते यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news