‘सोमेश्वर’चा गळीत हंगाम 9 ऑक्टोबरपासून; अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती | पुढारी

‘सोमेश्वर’चा गळीत हंगाम 9 ऑक्टोबरपासून; अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-2023 च्या 61 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. 9) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
या वेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आ. मकरंद पाटील, आ. संजय जगताप, आ. दीपक चव्हाण, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे हे मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या वेळी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारलेल्या मुलींचे वसतिगृह, एमबीए महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय, सोमेश्वर सार्वजनिक वाचनालय व सोमेश्वर कारखाना कामगार पतपेढी या सर्व संस्थांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच कारखान्याच्या को-जन. विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ, कारखाना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन, कारखाना कामगार वसाहतीमधील 3 इमारतींचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन या वेळी करण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली.

दसर्‍याला बॉयलर अग्निप्रदीपन
कारखान्याच्या येत्या 61 व्या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पत्नी रोहिनी जगताप आणि उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर व त्यांच्या पत्नी मनीषा होळकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे सध्या गतीने सुरू आहेत.

 

 

Back to top button