ओतूर : नगर-कल्याण महामार्गावर बर्निंग कारचा थरार | पुढारी

ओतूर : नगर-कल्याण महामार्गावर बर्निंग कारचा थरार

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: कल्याण-नगर महामार्गांवरील खामुंडी गावच्या हद्दीत हिंमत हवेली नामे थांब्यावर ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कोडा कारने अचानक पेट घेतला. या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांनी प्रसंगावधान राखत कार थांबवून ते कारबाहेर पडले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. ही घटना ४ ऑक्टोबरला पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार राजेंद्र बनकर, पोलीस पाटील किरण भोर व इतर पोलीस फौज घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आणली.

डुंबरवाडी टोल नाक्यावरील कर्मचारी यांच्या मदतीने अग्निशामक दलाला पाचरण करून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. विजय रामचंद्र शेलार (रा. ठाणे ) असे कार मालकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

 

Back to top button