सुखसागर येथील जागृत देवस्थान अंबा माता मंदिरात होते आहे दर्शनासाठी गर्दी | पुढारी

सुखसागर येथील जागृत देवस्थान अंबा माता मंदिरात होते आहे दर्शनासाठी गर्दी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सुखसागर नगर येथील अंबा माता मंदीरात देवीची स्थापना करण्यात आली असून नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. सुखसागर नगर येथील अंबा माता मंदिराची स्थापना १९९३ मध्ये स्व. धनराज मालचंद राठी यांनी केली. दरवर्षी या मंदिरामध्ये सर्व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले हे जागृत मंदिर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराची ख्याती आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येथे दर्शन घेण्यास वर्षभर येतात. महाशिवरात्री, दत्त जयंती, हनुमान जयंती, जन्माष्ठमी, श्रावण मास, दहीहंडी, आदी उत्सव येथे मोठ्या उत्साहात करण्यात येतात.

मंदिरात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात येते. देवीचे नवीन रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे. राजेश राठी व मंजू राठी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. सुखसागर कात्रज या भागात देवीचे जागृत देवस्थान म्हणुन हे मंदिर प्रसिद्ध झाले. नवरात्र महोत्सवात दरम्यान दररोज फक्त आयोजन येथे केले जाते. मंदिरात भोंडला, भजन, प्रवचन, श्रीसुक्त पठणचे आयोजन केले जाते. यावर्षी महोत्सवात १५१ कन्यांचे कन्यापूजनचे आयोजन हलवा पुरी प्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

“मैनाबाई धनराज राठी यांच्या मार्गदर्शन खाली संपूर्ण राठी परिवार मंदीराची, नवरात्र महोत्सवाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहे. महिला व मुलांकरिता खाऊ वाटप केले आहे. गेल्या २९ वर्षांत देवीच्या आशिर्वादाने अनेक सकारात्मक बाबी परिसरात घडल्या आहेत. आम्ही सर्व राठी कुटुंब मनोभावे मंदिरातील काम पाहतो. असे मंदिराचे पदाधिकारी मगराज राठी यांनी सांगितले.

Back to top button