पिंपरी :  रिवॉर्ड पॉईंट मिळाल्याचे सांगून फसवणूक | पुढारी

पिंपरी :  रिवॉर्ड पॉईंट मिळाल्याचे सांगून फसवणूक

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट मिळाल्याचे सांगून एकाची एक लाख 98 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्री घडली. दिग्विजय हिरालाल गढरी (28, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिग्विजय यांना 17 ऑगस्ट रोजी रिवॉर्ड पॉईंट मिळविण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती भरा, असा मेसेज आला. त्यानुसार, दिग्विजय यांनी लिंकवर क्लिक करून क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट अशी माहिती भरली. चोरट्यांनी या माहितीच्या आधारे क्रेडिट कार्डवरून एक लाख 98 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button