पुणे : प्रेमात हरवला ‘ती’च्या नकाराचा हक्क | पुढारी

पुणे : प्रेमात हरवला ‘ती’च्या नकाराचा हक्क

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रेमप्रकरणात दोघांनी समजुतीचा करार करून ब्रेकअप केल्यानंतरही तरूणीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी दबाव टाकून धमकी देणार्‍यावर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अशोक बारीकराव गायकवाड (32, रा. अप्पर इंदिरानगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरुणीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गायकवाड आणि तरुणीचे पूर्वी प्रेमसंबंध होते.

परंतु, त्यांच्या प्रेमात काही कारणास्तव खटके उडू लागल्याने त्यांनी त्यांचे प्रेमप्रकरण थांबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी 17 डिसेंबर 2022 रोजी मामलेदार कचेरी येथे जाऊन करारनामा केला. तेथे दोघांनी आपला रीतसर ब्रेकअप करून घेतला. परंतु, तीन वर्षांनंतर 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तरुणी ही रस्त्याने जात असताना अशोकने तिचा पाठलाग केला. ‘तू माझ्या सोबत लग्न कर, नाही तर मी तुला सुखाने जगू देणार नाही,’ अशी तिला धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button