पुणे : शहा, शिंदे, फडणवीस यांची सोशल मीडियातून बदनामी | पुढारी

पुणे : शहा, शिंदे, फडणवीस यांची सोशल मीडियातून बदनामी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांविरोधात बदनामीकारक व अश्लील मजकूर प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माहिती-तंत्रज्ञान सेलचे विनीत वाजपेयी (वय 39) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून एकावर गुन्हा नोंद केला आहे.

समाजमाध्यमांवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी रामदास शिर्के नावाच्या एका प्रोफाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही नेत्यांविरुद्ध अश्लील व बदनामीकारक मजकूर प्रसारित करून त्यांच्या लौकिकाला बाधा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सायबर पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आरोपी शिर्केने हिंदू एकता या समाजमाध्यमावरील समूहावर गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वाजपेयी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Back to top button