खेडमधील 56 गावांच्या हरकतींवर सुनावणी सुरू | पुढारी

खेडमधील 56 गावांच्या हरकतींवर सुनावणी सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू आहे. यामध्ये येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत खेड तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील 56 गावे तर मावळ तालुक्यातील 106 गावांमधील नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर 3 ते 13 ऑक्टोबरदरम्यान सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

पीएमआरडीए हद्दीत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील 817 गावांचा समावेश आहे. या सर्व गावांच्या हद्दीत पीएमआरडीएच्या वतीने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे. खेड आणि मावळ तालुक्याच्या सुनावणी 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ही सुनावणी दोन टप्प्यांत होणार आहे.

सुनावणीचे काम पीएमआरडीएच्या नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दीड आणि दुपारी दोन ते चार या वेळेत होणार आहे. हरकती दाखल केलेल्या अर्जदारांना सुनावणीबाबतचा तपशील रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. हा तपशील प्राधिकरणाच्या ुुु.िाीवर. र्सेीं.ळप या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील या गावांची होणार सुनावणी
कोयाळी तर्फे चाकण, पिंपळगाव तर्फे खेड, शेलगाव, वडगांव घेनंद, चांदूस, पिंपरी बुद्रुक, पिंपरी खुर्द, रोहकल, गोणवाडी, कोरेगाव खुर्द, शेलू, कोरेगाव बुद्रुक, किवळे, कुरकुंडी, आसखेड बुद्रुक, आसखेड खुर्द, करंजविहिरे, धामणे, कोये, गारगोटीवाडी, आखरवाडी, पांगरी, दोंदे, पाडळी, गुळाणी, जऊळके खुर्द, कमान, चास, टाकळकरवाडी, रेटवडी, खरपुडी बुद्रुक, खरपुडी खुर्द, मांजरेवाडी, वाकी बुद्रुक, काळूस, निमगाव, गोसासी, वारुडे, चिंचबाईवाडी, गाडकवाडी, वाफगाव, पूर, कन्हेरसर, दावडी, चिंचोशी, साबळेवाडी, बहुळ, कोहिंडे बुद्रुक, तळवडे बुद्रुक, पेठ, वाकी तर्फे वाडा, आहिरे, शिवे, वहागाव, तोरणे बुद्रुक आणि खडक गेव्हांडे.

Back to top button