बिबट्याच्या हल्ल्यात तरुण बचावला | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण बचावला

खोडद : मांजरवाडी/हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे शुक्रवार (दि. 30) सकाळी सहाच्या सुमारास प्रात:विधीसाठी जाणार्‍या तरुणावर घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. अक्षय रंगनाथ मुळे असे हल्ला झालेल्या युवकाचे नावे आहे. परंतु, प्रसंगवधान राखत तरुणाने आरडाआरडा करत बिबट्याच्या हल्ल्यातून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.

शुक्रवारी सकाळी नित्यनियमाप्रमाणे अक्षय घराजवळ असणार्‍या स्वछतागृहाकडे जात असताना अचानक बिबट्याने त्याचे दिशेने झेप घेत पकडण्याचा प्रयत्न केला. सावध झाल्याने या हल्ल्यातून सुटण्यात अक्षयला यश आले. या हल्ल्यात अक्षयच्या पाठीवर बिबट्याचा एक दात व नखांचे ओरखडे वठले आहे. त्यास नारायणगाव येथील सरकारी दवाखाना येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथे लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून अक्षय याला घरी सोडण्यात आले.

Back to top button