महाळुंगे इंगळे : फसव्या लिंकपासून सावध राहा : पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड | पुढारी

महाळुंगे इंगळे : फसव्या लिंकपासून सावध राहा : पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड

महाळुंगे इंगळे; पुढारी वृत्तसेवा: मुलींनो तुम्ही उद्याच्या रणरागिणी असून, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जागृत व्हा. सोशल मीडियावरून येणार्‍या फसव्या लिंकपासून सावध राहा, असे प्रतिपादन महाळुंगे इंगळे पोलिस चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड यांनी खराबवाडी येथे केले.

महाळुंगे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथे संतभारती ग्रंथालय, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोरवयीन मुलींसाठी ’बालकांचे हक्क व सुरक्षितता जागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांनी मुलींना बोलते करून पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली. सायबर क्राईम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण याविषयीही माहिती दिली.

महिला अत्याचार तक्रार समितीच्या केंद्रीय सदस्या व संतभारती ग्रंथालयाच्या सचिव मंगल देवकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुनंदा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कातोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण किर्ते, सदस्य तेजस वाडेकर, अ‍ॅड. अमर वाघ, अश्विनी बनसोडे आदी उपस्थित होते.

 

Back to top button