गोतोंडी सोसायटीला 50 लाखांचा नफा; सभासदांसाठी 15 टक्के लाभांश जाहीर | पुढारी

गोतोंडी सोसायटीला 50 लाखांचा नफा; सभासदांसाठी 15 टक्के लाभांश जाहीर

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: गोतोंडी (ता. इंदापूर) येथील गोतोंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 29) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीस चालू वर्षी 50 लाख 60 हजार रुपयांचा नफा झाला असून, सभासदांसाठी 15 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला, अशी माहिती सोसायटीचे सचिव मारुती नलवडे यांनी दिली. सोसायटीचे अध्यक्ष अंकुश निवृत्ती माने यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

या वेळी सचिव मारुती नलवडे यांनी अहवाल वाचन करून सोसायटीस 31 मार्च 2022 अखेर 50 लाख 60 हजार एवढा नफा झाला असून, सोसायटीचे भागभांडवल 1 कोटी 10लाख एवढे आहे. सभासद संख्या 1161 असून कर्जवाटप 5 कोटी 75 लाख असल्याचे सांगत सोसायटीचा लेखापरीक्षण ब वर्ग प्राप्त आहे. चालू वर्षी सोसायटीस नफा प्राप्त झाल्याने सभासदांसाठी 15 टक्के लांभास वाटप करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने जाहीर केला.

30 जून 2022 अखेर सोसायटीची 97 टक्के वसुली झाली आहे. थकबाकीदार कर्जदारांनी थकबाकी जमा करून सोसायटीस सहकार्य करावे, असे आवाहनदेखील सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने केले. या वेळी सोसायटीचे उपाध्यक्ष युवराज कांबळे, दिनकर नलवडे, अशोक कदम, कुंडलिक नलवडे, सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, बिभीषण नलवडे, अशोक शिंदे, अप्पा पाटील, सुरेश मारकड आदींसह संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Back to top button