पिंपरी : शहरात कोरोनाचे 41 रुग्ण बाधित | पुढारी

पिंपरी : शहरात कोरोनाचे 41 रुग्ण बाधित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 30) दिवसभरात 41 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 62 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 12 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 303 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे.

आज दिवसभरात 583 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 71 हजार 605 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 3 लाख 67 हजार 392 रुग्ण बरे झाले आहे.  4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Back to top button