पिंपरी : पोलिसांच्या सतर्कतेमुळे लूटमारीचा डाव उधळला | पुढारी

पिंपरी : पोलिसांच्या सतर्कतेमुळे लूटमारीचा डाव उधळला

पिंपरी : पेट्रोल पंपावरील रोकड आणि कंपनीतून कामावरून सुटलेल्या कामगारांना लुटण्याचा डाव चोरट्यांनी रचला. मात्र, महाळुंगे पोलिसांनी हा डाव उधळून लावला. गुरुवारी (दि. 29) मध्यरात्री कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. रोहन मोहन शिंदे (21, रा. चाकण), बालाजी संभाजी फत्तेपुरे (19, रा. आंबेठाण, मूळ रा. उस्मानाबाद), संदेश दत्ता जगताप (19, रा. आंबेठाण, मूळ रा. उस्मानाबाद) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह सनी, बबलू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस नाईक विठ्ठल वडेकर यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी कुरुळीगावातील पेट्रोल पंपावरील रोकड आणि कंपनीतील कामगारांना लुटण्याचा डाव रचला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी मध्यरात्री सुमारास सापळा रचून चोरट्यांचा डाव उधळून लावला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

Back to top button