पिंपरी : खंडणीप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : खंडणीप्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल चालकाला दहा हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड येथील रेणुका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी प्रकाश देव भट्ट (49, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तात्रय दिवटे (वय 42), ऋषिकेश डोगरा (वय 29, दोघेही रा. किवळे) यांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्यासह कुणाल वाल्मीकी (वय 27, रा. देहूरोड) याच्यावरही गुन्हा दाखल केला. फिर्यादी प्रकाश रेणुका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. दरम्यान, मंगळवारी (दि. 27) एक आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये दारू व जेवणाचे पैसे न देता निघून गेला. त्यानंतर आरोपी बुधवारी पुन्हा हॉटेलमध्ये आले.  त्यावेळी उधारीचे बिल द्या, त्यानंतर जेवण देणार, असे फिर्यादी यांनी त्यांना सांगितले. ‘तू मुझे पहचानता नही क्या, मै कौन हू, कुणाल भाईसे पैसा मांगेगा, मै यहा का भाई हू, मै हॉटेल तोड दुंगा, अशा शब्दात आरोपींपैकी एकाने फिर्यादी यांना धमकावले.

Back to top button