कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सोमवारपर्यंत पाऊस | पुढारी

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सोमवारपर्यंत पाऊस

पुणे;  पुढारी वृत्तसेवा :  हवामान विभागाने कोल्हापूरसह कोकण, सातारा, सांगली जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळाली आहे. गुरुवारी पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस महाराष्ट्रातून जायला 5 ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागांत सोमवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या भागांचा समावेश आहे.

Back to top button