पिंपरी : आचार्‍याचा हॉटेलमालकावर खुनी हल्ला | पुढारी

पिंपरी : आचार्‍याचा हॉटेलमालकावर खुनी हल्ला

पिंपरी : खराब कोबी फ्रिज मध्ये का ठेवली, असे विचारल्याचा राग आल्याने आचार्‍याने हॉटेलमालकाचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी सॉलिटर हॉटेल, हिंजवडी येथे घडली. क्रिशांत राजीव अगरवाल (30, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गौरहरी गिरधारी मंडल (30, रा. कोलकाता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे हिंजवडी येथे सॉलिटर नावाने हॉटेल आहे. आरोपी गौरहरी हा त्यांच्या हॉटेलमध्ये आचारी होता. दरम्यान, त्याने सडलेला कोबी फ्रिज मध्ये ठेवला, त्यामुळे फिर्यादी यांच्या आईने आरोपीला विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांची कॉलर धरून त्यांना माझा आत्ताच्या आत्ता पगार करा, नाहीतर मी तुमचा खून करीन अशी धमकी दिली. तसेच, फिर्यादी यांचा गळा दाबला. फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपीला समजावून सांगितले. मात्र, तरीदेखील आरोपी लाकडी बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. तसेच, फिर्यादी यांच्या वडिलांचीही गचांडी धरली.

Back to top button