दिवाळीपूर्वी निरा-भीमाचा रु.311 चा हप्ता : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

दिवाळीपूर्वी निरा-भीमाचा रु.311 चा हप्ता : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

बावडा : पुढारी वृत्तसेवा : निरा भिमा कारखान्याकडून शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी प्रति टनास रु. 311 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा केली जाईल. कारखान्याकडून जाहीर केले प्रमाणे प्रति टनास रु.2501 प्रमाणे दर दिला जाईल, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि. 27) दिली. शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. या सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते म्हणाले, कारखान्याने शेतकर्‍यांना रु. 2100 प्रमाणे हप्ता अदा केला असून, दिवाळीपूर्वी रु. 311 प्रमाणे होणारी रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल. आगामी काळात इथेनॉल प्रकल्पाची उत्पादन क्षमता 2 लाख लिटर प्रतिदिनी करण्याचे नियोजन आहे.आगामी गळीत हंगामात कारखाना 8 लाख टन उसाचे गाळप करणार आहे. आज अखेर सुमारे 9.5 ते 10 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. याप्रसंगी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, देवराज जाधव, अनिल पाटील, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील आदी उपस्थित होते. अहवाल वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news