पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राला भोसकले | पुढारी

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राला भोसकले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवीगाळ केल्याच्या कारणातून झालेल्या वादात मित्रांनी मित्राला मारहाण करत त्याच्या पोटात चाकूने भोसकले. ही घटना सोमवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर परिसरात घडली.  या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सारंग काळभोर, सौरभ काळभोर, दीपक क्षीरसागर या तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुमित ऊर्फ पप्पू दत्तात्रय वाळुंजकर (वय 24) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत गणेश विठ्ठल नगिने (वय 32, रा. लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार तिघांच्या गुन्हा दाखल केला. सुमित हा फिर्यादी गणेश नगिने यांचा भाचा आहे. तर आरोपी आणि सुमित हे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी सारंगसोबत सुमितचा वाद झाला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी सुमितला शिवीगाळ करून हाताने मारहाण करत पेवर ब्लॉकचा तुकडा डोक्यात आणि कपाळावर मारला. तर सौरभने सुमितला जिवे मारण्याच्या हेतूने पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर सुमितचा मामा गणेश नगिने यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.

Back to top button