पुणे: गिरवली आयुका केंद्रामधील घाटात शाळेची बस दरीत कोसळून ४९ जण जखमी | पुढारी

पुणे: गिरवली आयुका केंद्रामधील घाटात शाळेची बस दरीत कोसळून ४९ जण जखमी

संतोष वळसे पाटील

मंचर, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडेमधील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीना घेऊन जाणारी स्कूल बस गिरवली येथील आयुका केंद्राच्या घाट वळणावरून दरीत कोसळली. बसमधील विद्यार्थी, शिक्षक आणि स्कूल बस चालक असे एकूण ४९ जण जखमी झाल्याची घटना मंगळवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

अपघातग्रस्त विद्यार्थी आणि शिक्षकांना दरीतून बाहेर काढून घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आळायची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेची बस ४४ विद्यार्थी, ३ शिक्षक, एक शिपाई घेऊन गिरवली येथील आयुका दुर्बीण केंद्र पाहण्यास गेली होती. या केंद्राला परतत असताना घाटातील एका वळणावर स्कूल बस चालक निलाधर लाडके याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि स्कूल बस रस्ता सोडून ३० फुट खोल असलेल्या दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याचा आवाज एकूण स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमी विद्यार्थी ,शिक्षक आणि स्कूल बस चालक यांना जखमी अवस्थेत गिरवली सरपंच संतोष सैद ,किरण सैद ,अनिल सैद आणि घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी कसेबसे बाहेर काढले.

त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालय ,मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये ज्योती लाडके, आश्विनी जाधव ,साक्षी काळे, समीक्षा काळे ,श्रावणी कोरके, अपर्णा लोहकरे, पूजा लोहकरे, तेजल मधे, साक्षी पारधी, श्रेया पांडे, अथर्व बोऱ्हाडे, साहिल गुंजाळ, आकाश वाघ, अपर्णा भास्कर, दिक्षा जोशी, नम्रता लाडके, रुतिका लोहकरे, ज्ञानेश्वरी राऊत, मयंक भवारी, आदित्य गायकवाड, ऋग्वेद जाधव, अथर्व कदम, संकेत कोळप, ज्ञानराज पांडे, सानिका डेरे, ईश्वरी फाले, श्रुती इष्टे, सोनल जाधव, किशोरी काळे, प्रगती काळे, दीक्षा लोहकरे, ऋतुजा लोहोकरे, आदिती पाचंगे, गीतांजली शर्मा, सानिका वाळुंज, सिद्धेश भालेराव, यश भास्कर ,सार्थक ढमढेरे, सुरज जोशी, महेश लोहकरे, आनंद मधे, तेजस मधे, अजय पारधी, आशिष पारधी आणि शिक्षक आवटे, मुळे, विनायक, शिपाई सुरज काळोखे यांचा समावेश आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजितशेठ काळे, स्कूल कमेटी अध्यक्ष सुरेशशेठ काळे, जयसिंग काळे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने मदत केली आहे. स्कूल बसचा अपघात कशामुळे झाला याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली .

Back to top button