पिंपरी : फेसबुक फ्रेंडकडून 58 लाखांचा गंडा | पुढारी

पिंपरी : फेसबुक फ्रेंडकडून 58 लाखांचा गंडा

पिंपरी : विमानतळावर पकडले असल्याचे सांगून फेसबुक फ्रेंडने एकाची 58 लाख 78 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत फेसबुक आणि ऑनलाईन माध्यमातून घडला. याप्रकरणी शाम ओझरकर (54, रा. पाटीलनगर, बावधन) यांनी रविवारी (दि. 25) हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. विल्यम अल्बर्ट याच्यासह मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची आरोपी विल्यमसोबत फेसबुकवर ओळख झाली. आरोपीने आपण पर्यटनासाठी भारतात येत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच, प्रमाणापेक्षा अधिक डॉलर असल्याने आपल्याला कस्टम अधिकार्‍यांनी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतल्याचे फिर्यादीस सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर 58 लाख 78 हजार 700 रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली.

Back to top button