पुणे: पिस्तुल बाळगणार्‍या सराईताला अटक | पुढारी

पुणे: पिस्तुल बाळगणार्‍या सराईताला अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात नवरात्री उत्सवाची धामधुम असताना खडक पोलिसांनी बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगणार्‍या सराईतला जेरबंद केले आहे. ऋषिकेष उर्फ सोन्या संदिप मंडलिक (26, रा. लोहीयानगर सध्या रा. कात्रज कोंढवा बायपास रोड, निंबाळकर वस्ती) असे जेरबंद करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

24 सप्टेंबर रोजी काशेवाडी पोलिस चौकीचे प्रभारी नितीनकुमार नाईक, अमलदार तेजस पांडे, संदीप तळेकर विशाल जाधव हे नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना सोन्या मंडलीक हा हा कंबरेला पिस्तुल लावून नेहरू रोडवरील सोनवणे हॉस्पीटल जवळ थांबला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता यादव यांना याबाबत माहीती देऊन पथकाने सोन्या मंडलीकला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळून स्टीलची बॉडी असलेले पिस्तुल, मॅगझीन व पाच जिवंत काडतुसे यावेळी जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता यादव, गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button