जेजुरीगडावर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना | पुढारी

जेजुरीगडावर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर घटस्थापनेनिमित्त विधिवत धार्मिक उपक्रम राबवून श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करण्यात आली. अश्विन प्रतिपदेनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सर्व मूर्तींची पाकळनी करून नवीन पोशाख घालण्यात आले. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करून श्री खंडोबा देवाची महारतीने घटस्थापनेला सुरुवात करण्यात आली. गुरव, घडशी, वीर, कोळी, पुजारी, सेवक वर्ग, नित्यसेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ, विश्वस्त, कर्मचारी तसेच भाविकांच्या समवेत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मुर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर उत्सव मूर्ती बालद्वारीत ठेवण्यात आल्या.

यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे, चेतन सातभाई, अनिल बारभाई, मिलिंद सातभाई, संतोष आगलावे, मयूर दीडभाई, नित्यसेवेकरी जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सुधाकर मोरे, समीर मोरे, हनुमंत लांघी आदींनी विधिवत पूजा अभिषेकचा धार्मिक विधी केला.

बालद्वारीतील घटस्थापना मंदिरात उत्सव मूर्तींची स्थापना करून महारती करण्यात आली. या धार्मिक विधीचे पौराहित्य शशिकांत सेवेकरी यांनी केले. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने जेजुरीगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. घडशी समाजाचे सुमंगल सनई वादन, वाघ्या मुरुळी व लोककलावंतांचा जागर जेजुरी गडावर सुरु झाला असून घटस्थापनेनिमित्त हजारो भाविकांनी जेजुरी गडावर देवदर्शनासाठी गर्दी केली होती.

 

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात फुलांची केलेली सजावट


घटस्थापनेसाठी वाजत गाजत श्री खंडोबा व म्हाळसादेवीची उत्सव मूर्ती वाजत गाजत मंदिरात बाल्द्वारीत नेहताना.

 श्री खंडोबा व म्हाळसादेवींची उत्सव मूर्तीवर अभिषेक करताना


(सर्व छाया: महेश शिंदे, जेजुरी)

Back to top button