बारामती : घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला दुःखद घटना: नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

बारामती : घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला दुःखद घटना: नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

बारामती; पुढारी वृत्तसेवा: काऱ्हाटी येथील शुभम संतोष खंडाळे हा वीस वर्षीय तरुण २५ सप्टेंबर रोजी आईसोबत गोधडी धुण्यासाठी नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये गेला असता पोहताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शुभम संतोष खंडाळे हा वीस वर्षाचा तरुण आई जयश्री खंडाळे यांच्या समवेत गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदी पात्रातील बंधाऱ्यामध्ये गेला होता. गोधडी धुतल्यानंतर तो आणि त्याचा मित्र बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी उतरला. याच दरम्यान पोहताना त्याचा मृत्यू झाला. शुभम शालेय शिक्षण सुरू असताना तो त्याच्या वडिलांना वडापावच्या गाडीमध्ये, तसेच केरसुणी बनवण्यासाठी मदत करायचा.

एक मन मिळाऊ व्यक्ती म्हणून तो गावात सर्व परिचित होता. बारावी नंतर तो पोलीस भरतीपूर्व खाजगी अकॅडमीमध्ये तो सातारा येथे प्रशिक्षण घेत होता. सुट्टी दरम्यान आला असताना घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला ही दुःखद अशी घटना घडली. घटनेची माहिती समजताच बारामती तहसीलदार विजय पाटील मंडलाधिकारी एस. डी. मुळे , गाव कामगार तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली व खंडाळे कुटुंबियांचे सांत्वन केले.

Back to top button