ओतूर : बनकर फाटा येथील अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

ओतूर : बनकर फाटा येथील अपघातात एकाचा मृत्यू

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: नगर- कल्याण महामार्गावरील उदापूर गावाच्या हद्दीत बनकर फाटा येथे पुष्पवती नदी पुलाजवळ ट्रक, दुचाकी व पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ओतूर पोलिसांनी ही माहिती दिली.
ट्रक (एमएच 14 ई एम 7286), पिकअप (एमएच 14 जी एल 4921) व दुचाकी (एमएच 14 एच झेड 7434) यांचा भीषण अपघात झाला.

त्यात संपत भाऊ डोके (वय 30, रा. आंबेगव्हाण) या तरुणाचा मृत्यू झाला. अनिल काळे (रा. डिंगोरे) तसेच संदीप डोके (रा. आंबेगव्हाण) हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पिकअपला दुचाकी ओव्हरटेक करीत असताना दुचाकीला पिकअपचा धक्का लागल्याने दुचाकीवरील तिघेही फेकले जाऊन आलेल्या ट्रकखाली तिघेही सापडले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

Back to top button