हवाहवाई! पुणे विमानतळावरून एकाच दिवशी सर्वाधिक उड्डाणे | पुढारी

हवाहवाई! पुणे विमानतळावरून एकाच दिवशी सर्वाधिक उड्डाणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळानंतर पुणे विमानतळावरून शुक्रवारी (दि.23) पहिल्यांदाच एकाच दिवशी 156 विमानांची ये-जा झाली आहे. त्याद्वारे इतर दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक 22 हजार 580 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे पुणे विमानतळावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे विमानतळावरून शुक्रवारी  दिवसभरात 79 विमानांनी उड्डाण केले,  तर 77 विमाने पुणे विमानतळावर राज्यातील विविध विमानतळांवरून आली. अशी एकूण 156 विमानांची एकाच दिवसात ये-जा झाली आहे. यात 11 हजार 474  प्रवासी पुण्यातून बाहेर गेले, तर 11 हजार 133 प्रवासी पुण्यात आल्याची पुणे विमानतळ प्रशासनाकडे नोंद आहे. ही संख्या कोरोनाकाळानंतर एकाच दिवसातील  सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.

23 सप्टेंबर
आगमन झालेली विमाने : 77 प्रवासी : 11133
निर्गमन झालेली विमाने : 79
प्रवासी : 11474

18 सप्टेंबर
आगमन झालेली विमाने : 76
प्रवासी : 11145
निर्गमन झालेली विमाने: 77
प्रवासी : 11267

आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये लवकरच वाढ
सध्या पुणे विमानतळावरून दिवसभरात एका आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण आणि उर्वरित देशांतर्गत विमानांची उड्डाणे होत आहेत. यात आंतरराष्ट्रीय उड्डाण दुबई, शारजाह येथे होत आहे. नुकतेच केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया पुण्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी पुणेकरांच्या मागणीनुसार येथील विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यावर आणखी 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणार असल्याचे सांगितले आहे.

विमानांची एकाच दिवशी पुण्यातून सर्वाधिक उड्डाणे

156 प्रवाशांनी केला पुणे

22580 विमानतळावरून प्रवास

Back to top button