खेडला भात पिकांना लोंब्या लगडल्या दमदार पावसाने पीक जोमात | पुढारी

खेडला भात पिकांना लोंब्या लगडल्या दमदार पावसाने पीक जोमात

कडूस; पुढारी वृत्तसेवा: भात पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात पीक जोमात आले असून, भात पिकांना लोंब्या लगडल्या आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाशेरे, औदर, देओशी, येणिये, भोरगिरी, वाडा, कहू कोयाळी परिसरात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

पश्चिम भागातील भात खाचरांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी उपलब्ध होत असल्याने परिसरातील शेतकरी खरिप हंगामात मुख्य पीक म्हणून भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. सध्या परिसरातील भात पीक जोमात आले असून भात पिकांच्या लोब्या भरण्यास सुरुवात झाली आहे.

Back to top button