जिल्हा दूध संघाकडून वेल्ह्यात लसीकरण | पुढारी

जिल्हा दूध संघाकडून वेल्ह्यात लसीकरण

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: राजगड, तोरणा खोर्‍यासह वेल्हे तालुक्यातील दीड हजारांवर गाय, बैल, वासरे अशा जनावरांना पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध संघाच्या वतीने मोफत लम्पी प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लम्मीची साथ रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मदतीला जिल्हा दूध संघही धावून आला आहे.

जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील दुर्गम भागात लसीकरण सुरू करण्यात आले. विंझर (ता. वेल्हे) येथे पासलकर यांच्या हस्ते लसीकरण सुरू करण्यात आले. आंबेड, रांजणे, कोंडगाव आदी ठिकाणी लसीकरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण राऊत, तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, डॉ. विनायक करमरकर, डॉ. सुनील भेलके, शिवाजी भोसले, रघुनाथ राऊत आदींसह विविध गावांचे सरपंच, दूध सोसायटीचे अध्यक्ष, तसेच शेतकरी उपस्थित होते.

Back to top button