पिंपरी : जमीन व्यवहारात एक कोटीची फसवणूक | पुढारी

पिंपरी : जमीन व्यवहारात एक कोटीची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : एकाच जागेचा दोन वेळा विकसन करारनामा करून विकसकाची एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2003 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत कासारवाडी येथे घडली. महेश अमरसी सपारिया (रा. दवाबाजार, चिंचवड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भगवान खंडू चव्हाण (90, रा. कासारवाडी), किशोर विष्णू चव्हाण (58, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सन 2003 मध्ये फिर्यादी यांच्यासोबत जमिनीचा विकसन करारनामा केला. सन 2018 पर्यंत त्यांनी फिर्यादीकडून हक्कसोड, वाटणीपत्र, भाड्यासाठी वेळोवेळी एक कोटी पाच लाख 69 हजार 108 रुपये घेतले. दरम्यान, फिर्यादी यांच्यासोबत विकसन करारनामा झालेला असतानाही आरोपींनी सन 2017 मध्ये स्काय लाईन डेव्हलपर्स यांच्याशी पुन्हा विकसन करारनामा व खरेदीखत केले, असे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button