<---- Script to Prevent Copy Paste-----> <--- Code End----->

मुळशीत लम्पीची लसीकरण मोहीम जोरात

मुळशीत लम्पीची लसीकरण मोहीम जोरात

पौड; पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील भुकूम येथे प्रथम लम्पीग्रस्त बैल आढळल्यानंतर कुळे, वाळेन, मारुंजी व मुलखेड या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आली. या भागात खासगी पशुवैद्यकांच्या सहकार्याने एकूण 10 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. तालुक्यात एकूण 22 हजार गोवर्गीय पशुधन आहे. शासनाने 20 सप्टेंबर रोजी बाधित क्षेत्र बाहेरदेखील गाय व बैलवर्ग यास लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार उर्वरित 12 हजार गायवर्गीय पशुधनास लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मुळशी तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्त पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक तसेच खासगी पशुधन पर्यवेक्षक यांचे सहकार्याने 26 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. दि. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या तीन दिवसात मुळशी तालुक्यात लम्पी प्रतिबंधक महालसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.

लम्पी चर्मरोग सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार अभय चव्हाण तसेच समितीचे सदस्य गटविकास अधिकारी संदीप जठार व सदस्य सचिव पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सचिन काळे यांनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील सर्व पशुपालकांनी लसीकरणास येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना योग्य ते सहकार्य करावे. आपले पशुधन लसीकरणासाठी उपलब्ध करून द्यावेत व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुकास्तरीय सनियंत्रण समितीने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news