जेजुरी : आमदार राहुल कुल जेव्हा कांचन वहिनींना पाच पायऱ्या उचलून घेतात !…. | पुढारी

जेजुरी : आमदार राहुल कुल जेव्हा कांचन वहिनींना पाच पायऱ्या उचलून घेतात !....

जेजुरी पुढारी वृत्तसेवा : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जेजुरी गडावर जात असताना दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना पाच पायऱ्या उचलून घेतले.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवार दि २३ रोजी सकाळी जेजुरी गडाला भेट दिली. गडाच्या पाठीमागून पायरीमार्गाने गडावर जाताना यावेळी विवाह झाल्या नंतर वराने वधूला जेजुरी गडावर जाताना पाच पायऱ्या उचलून घेवून जावे लागते अशी माहिती निर्मला सीतारामन यांना देण्यात आली.

याच वेळी हर्षवर्धन पाटील आणि इतरांनी आमदार राहुल कुल यांना त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना पाच पायऱ्या उचलून घेण्याचा आग्रह केला . लागलीच आमदार राहुल कुल यांनी कांचन कुल यांना पाच पायऱ्या उचलून घेतले. यावेळी सर्व उपस्थितांनी येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष केला .

Back to top button