चिखली जलशुद्धीकरण वाहिनीचे काम पूर्णत्वाकडे

चिखली जलशुद्धीकरण वाहिनीचे काम पूर्णत्वाकडे
Published on
Updated on

पिंपरी : आंद्रा आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून उचलण्यात येणार्‍या 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यात येणार आहे. आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाणी उचलून ते शहराला पुरवठा करण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे अशुद्ध उपसा केंद्र तसेच, निघोजे ते चिखली जलवाहिनीचे काम अंतिम टप्पात आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या अखेरीस शहराला अतिरिक्त 100 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता चंद्रकांत मुठाळ, डीआरए कन्सल्टंट सल्लागार कंपनीचे संदीप पुरोहित यांनी वरील प्रकल्पाची माहिती दिली.

शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणत आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखलीत 300 एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. पहिल्या टप्प्यात चिखलीत 100 एमएलडी क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी एकूण 46 कोटी 48 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. नागपूरचे गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी काम करीत आहे.

शहराची तातडीची गरज लक्षात घेऊन आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले 100 एमएलडी पाणी पालिका निघोजे येथील अशुद्ध जलपसा केंद्रातून उचलणार आहे. ते कामही पूर्ण झाले आहे. तसेच, येथे दहा दिवसांपूर्वी वीजपुरवठा करण्यात आला आहे.
निघोजेपासून चिखलीच्या केंद्रापर्यंत सुमारे 6 किलोमीटर अंतर 1,200 मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी आणले जाणार आहे. ते कामही पूर्ण झाले आहे. येत्या 10 दिवसांत वीजपुरवठा आल्यानंतर चाचण्या घेऊन चिखलीतील यंत्रणा सुरू केली जाईल. तसेच, शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍यासाठी म्हेत्रेवस्तीतील सोनवणे वस्तीपर्यंत जलवाहिनी येत्या 15 दिवसांत टाकली जाणार आहे.

चिखलीत पाणी शुद्ध होऊन स्पाईन रोड येथील टाकीत पाणी सोडले जाईल. त्यातून समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, निघोजे व तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागात पाणीपुरवठा केला जाईल. सुरुवातीला 50 ते 60 एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर टप्पाटप्पाने 100 एमएलडी पाणीपुरवठा केला जाईल. तेथे निगडी सेक्टर क्रमांक 23 येथून केला जाणारा 100 एमएलडी पाणीपुरवठा दुसर्‍या भागात वळविला जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. पावसाळ्यातील चार महिने इंद्रायणीतून पाणी उचलण्याचे नियोजन आहे.

भामा आसखेड धरणाजवळ 200 एमएलडी क्षमतेचा 'जॅकवेल' बांधणार!
भामा आसखेड धरणातील 167 एमएलडी पाणी पालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी उचलण्यासाठी पालिका धरणाजवळ वाकीतर्फे वाडा येथील 1.20 हेक्टर जागेत 200 एमएलडी प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब—ीज, सबस्टेशन बांधणार आहे. तेथून नवलाख उंबरे येथील ब—ेक प्रेशर टँकपर्यंत पाणी आणले जाईल. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे. त्या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, धरणाजवळ पुणे महापालिकेचा जॅकवेल वर्षापूर्वी तयार झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news