भोर: भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत 33 प्रकरणे निकाली काढून 11 लाख 88 हजार 870 रुपयांची वसुली करण्यात आली. दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी(दि. 11) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 394 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 16 प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 9 लाख 94 हजार 114 रुपयांची वसुली झाली.
यावेळी 1115 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 173 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 1 लाख 94 हजार 756 इतक्या रकमेची वसुली झाली. एकूण 1409 प्रकरणांपैकी 33 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण 11 लाख 88 हजार 870 रुपयांची वसुली झाली. (Latest Pune News)
लोकअदालतीत न्यायाधीश नेहा नागरगोजे, अॅड. सुवर्णा बदक, न्यायाधीश मीना जाधव, अॅड. शिवाजी पांगारे यांनी कामकाज पाहिले. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. संतोष बाठे व सर्व पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते.
दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, वंदे मातरम पतसंस्था व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी या वेळी उपस्थित होते.