पुणे : विमानतळ ते विमाननगर पर्यायी मार्ग होणार

पुणे : विमानतळ ते विमाननगर पर्यायी मार्ग होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौ. मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे, येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती खासदार गिरीष बापट यांनी दिली.

विमानतळापासून विमाननगरला जोडणारा पर्यायी रस्त्यावर असलेली संरक्षण विभागाची 0.58 एकर (2350 चौ.मी.) जागेवर पुणे मनपाला काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा रस्ता गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमाननगरला व विमानतळावर जाण्यासाठी इतर पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता. तसेच या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यायाने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब व मानसिक त्रास होत होता. तसेच नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सदरची जागा पुणे मनपाला रस्ता बनवण्यासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्यासाठी खासदार गिरीश बापट यांचे कडून केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबधित विभागाचे अधिकारी यांचे स्तरावर पाठपुरावा सुरू होता.

अखेर, संरक्षण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून 19 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार पुणे विमानतळावरून 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी प्रस्तावित 20 मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news