पिंपरी : भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी सहकार्य करावे : महापालिका आयुक्त सिंह

पिंपरी : भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी सहकार्य करावे : महापालिका आयुक्त सिंह
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांकडून नागरिकांवर विशेषत: लहान मुलांना जखमी करण्याच्या घटना वाढत आहेत. या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेला नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. जनसंवाद सभेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रारी वारंवार करण्यात येत आहे. तसेच, पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे यासंदर्भात मोठ्या संख्येने तक्रारी येत आहेत. त्यावर ठोस कारवाई केली जात नाही. पालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे का, या प्रश्नांवर ते बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, कुत्र्यांमुळे नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग कार्यरत आहे. त्यासाठी स्वयंसेवी संघटनांची मदत घेण्यात येत आहे.  नागरिकांनी ही पालिकेस सहकार्य करणे गरजेचे आहे. काही नागरिक तसेच, व्यावसायिक व दुकानदार मोकाट व भटक्या कुत्र्यांचे पालन करतात. त्यांना खाऊ घालतात. उघड्यावर शिल्लक अन्नपदार्थ टाकले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचे पोषण होते.

परिणामी, अशा कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यांचा त्रास शहरवासीयांना होत आहे. हा सर्वच शहराचा जटील प्रश्न बनला आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या वाढणार नाही, यासाठी नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. पाळीव कुत्र्यांचा महापालिकेकडून ऑनलाइन परवाना घ्यावा. कुत्री फिरवताना ते सार्वजनिक ठिकाणी शौच करणार नाहीत, यांची दक्षता घ्यावी. अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news