पिंपरी : श्वानांची दहशत महापालिका रोखणार, तीनशे पिंजरे खरेदी करणार | पुढारी

पिंपरी : श्वानांची दहशत महापालिका रोखणार, तीनशे पिंजरे खरेदी करणार

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या 83 हजारांवर पोचली असून, या कुत्र्यांची दहशत महापालिका आता रोखणार आहे. श्वानांच्या नसबंदीसाठी महापालिका स्वतःची यंत्रणा उभारणार आहे. भटक्या श्वानांचे लसीकरण आणि त्यांनी इतरांवर हल्ला केल्यास संबंधितांच्या उपचाराचा खर्च करण्याची जबाबदारी त्यांना खाऊ घालणार्‍यांचीच आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
समस्येवर तोडगा निघणे गरजेचे  मुंबई आणि केरळमधील भटक्या श्वानांच्या प्रश्नावरून दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी करताना न्या. संजीव खन्ना आणि न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. भटक्या श्वानांच्या समस्येवर लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. प्राण्यांचे अधिकार आणि नागरिकांची सुरक्षितता यात समतोल साधणे गरजेचे आहे, ” असेही न्यायालयाने म्हटले आहे.त्यामुळे श्वानांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चाळीस व्यक्तींमागे एक भटके कुत्रे असते. पिंपरी-चिंचवड शहराची 27 लाख लोकसंख्या पाहता शहरात 83 हजार भटकी कुत्री आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया हा महत्त्वाचा उपाय आहे. पालिका निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करत असताना अँटी रेबीजचे लसीकरण करते.

नसबंदी शस्त्रक्रियेत गोलमालची चर्चा
कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप 18नोव्हेंबर 2021 च्या पालिका सभेत करण्यात आला. लॉकाडऊन काळात सर्व काही बंद असताना सात हजार 125 कुत्र्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा पालिकेने केला आहे. एवढेच नाही, तर त्यापोटी 71 लाख रुपये मोजले आहेत.

बोगस बिलाच्या आधारे  पैसे दिल्याचा आरोप
अटी-शर्तीनुसार निर्बीजीकरण केलेल्या श्वानाचे छायाचित्र काढणे गरजेचे असताना छायाचित्रे काढली नाहीत. पालिकेने बोगस बिलाच्या आधारावर पैसे दिले, असा आऱोप करीत या भ्रष्टाचारात भाजपचा पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप या सभेत राष्ट्रवादीने केला भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनीही त्यास साथ दिली. त्यामुळे या विषयाकडे लक्ष वेधले गेले.

सध्या दररोज सुमारे 15 शस्त्रक्रिया
सध्या कॅनोयन केअर स्वयंरोजगार संस्थेच्या मदतीने नेहरूनगर येथे श्वानावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे दहा ते पंधरा श्वानांवर रोज शस्त्रक्रिया केल्या जातात महापालिका आता डॉट पॉण्ड तयार करणार असून 300 पिंजरे घेणार आहे त्यामुळे दररोज 40 ते 50 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करता येतील असा पालिकेचा दावा आहे.

शस्त्रक्रियेसाठी पालिकेचे स्वतंत्र पथक
सध्या कॅनोयन केअर अँड कंट्रोल स्वयंसेवी संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे बजाज फाउंडेशनच्या सीएसआर फंडामधून हा खर्च केला जातो लाईट, वीज, पाणी आदी सुविधा महापालिका देते. खाणे आदीचा खर्च बजाज फाउंडेशन तर्फे केला जातो कुत्र्यांचाही खर्च बजाज तर्फे केला जातो; मात्र आता महापालिका कुत्र्यांवरील नसबंदी शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र पथक तयार करणार आहे. कुत्र्यांची एक मादी वर्षात वीस पिल्लांना जन्म देते हे लक्षात घेऊन नसबंदी शस्त्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे.

कॅनॉईन कंट्रोल अँड केअर (Canoine Control and Care)  
ही संस्था सर्व खर्च करते. दिवसाला 10 ते 15 श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जातात हे लक्षात घेता पालिकेचे दररोज 15 हजार रुपये वाचतात.

 

श्वानांच्या नसबंदीवर भर दिला जात आहे सध्या कॅनोयन केअर अँड कंट्रोल स्वयंसेवी संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम केले जात आहे मात्र भविष्यात महापालिका श्वानांच्या नसबंदीसाठी स्वतःची यंत्रणा उभारणार आहे .शहरात 46 खासगी पेट हॉस्पिटल आहेत. श्वानमालक तेथेही कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करवून घेतात अँटी बेरीज व्हाक्सिनेशनही करून घेतात.
      -सचिन ढोले, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

 

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या : 83,000
एक मादी श्वान वर्षभरात वीस पिल्लांना देते जन्म सध्या महापालिका व कॅनोन केअर कंट्रोल स्वयंसेवी संस्थेतर्फे कुत्र्यांची नसबंदी रोज 10 ते 15 श्वानांवर नसबंदी कुत्र्यांच्या नसबंदी साठी महापालिका उभारणार स्वतःची यंत्रणा. डॉग पॉण्ड तयार झाल्यावर 300 पिंजर्‍यात रोज होणार 40 ते 50 शस्त्रक्रिया पूर्वी एक श्वानाची नसबंदी करण्यासाठी 999 रुपये खर्च येत होता. सध्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

Back to top button