पुणे : कोथिंबीर जुडी 50 रुपये; मेथीही महाग, पावसाने पालेभाज्यांचा दर्जा घसरला | पुढारी

पुणे : कोथिंबीर जुडी 50 रुपये; मेथीही महाग, पावसाने पालेभाज्यांचा दर्जा घसरला

पुणे : पावसाच्या संततधारेमुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दर्जात घसरण झाली आहे. मात्र, पितृपक्षामुळे पालेभाज्यांना मागणी मोठी असल्याने दर्जाहीन पालेभाज्याही भाव खाऊ लागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांचे दर कडाडले असून, कोथिंबिरीच्या एका जुडीला 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वच पालेभाज्यांचे जुडीचे दर 20 ते 40 रुपयांवर पोहचले आहेत.

तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बाजारात पावसाचा मार बसलेल्या पालेभाज्या दाखल होत आहेत. ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे तेथून दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे. मात्र, हे प्रमाण अवघे वीस टक्केच आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 25 हजार जुड्या व मेथीच्या 50 हजार जुड्यांची आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून आहे.

पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असून, दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे.

                                                               – चरण वणवे, भाजी विक्रेते

पालेभाजी दर    (11 सप्टेंबर) दर          (18 सप्टेंबर)
कोथिंबीर           20 ते 25 रुपये           40 ते 50 रुपये
मेथी                 20 ते 25 रुपये          25 ते 30 रुपये
पुदिना                 5 ते 10 रुपये          10 ते 15 रुपये
शेपू                    15 ते 20 रुपये          20 ते 25 रुपये
पालक                15 ते 20 रुपये          30 ते 40 रुपये
चुका                   10 ते 15 रुपये          20 ते 25 रुपये

 

Back to top button