पिंपरी : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

File Photo
File Photo

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडला. आकाश चंद्रकांत पुट्टे (26, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अंजूषा आकाश पुट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव आहे. याप्रकरणी अंजूषा यांचे वडील संजीवकुमार मोहनराव वल्लापे (47, रा. कर्नाटक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा आरोपी आकाश याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांपासूनच आकाश याने अंजूषा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, दारू पिऊन आल्यानंतर आरोपीने वारंवार अंजूषा यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. शेवटी या त्रासाला कंटाळून अंजूषा यांनी बुधवारी (दि. 14) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news