तळेगाव स्टेशन : पाऊस जोरदार निसर्ग हिरवागार, पर्यटकांचा ओढा वाढला | पुढारी

तळेगाव स्टेशन : पाऊस जोरदार निसर्ग हिरवागार, पर्यटकांचा ओढा वाढला

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा :  तळेगाव दाभाडे परिसरात पाऊस जोरदार बरसत असून सरीवर सरी येत आहेत. यामुळे निसर्ग बहरत असून हिरवागार झाला आहे. आणि ते दृश्य नेत्रदीपक आहे. दोन दिवसापासून जराशी उघडीप झाली असून नागरिक दैनंदिन कामे पूर्ण करत आहेत. पाऊस जरी संततधार पडत असलातरी एवढ्यात जिवीतहानी,वित्तहानी झालेचे वृत्त नाही. सध्या पाऊस संथ पडत आहे. वादळवारे नसल्यामुळे झेंडू,गुलछडी आदी फुलझाडे उत्पादनास फायदेशीर आहे. यामुळे फुल उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.

Back to top button