पुणे : दोन महिन्यांमध्ये 96 हजार जणांना मोफत बुस्टर डोसचा लाभ | पुढारी

पुणे : दोन महिन्यांमध्ये 96 हजार जणांना मोफत बुस्टर डोसचा लाभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात 15 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत 18 ते 59 वयोगटात 96 हजार 717 जणांनी मोफत बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. मोफत बुस्टर डोस 30 सप्टेंबरपर्यंत दिला जाणार आहे.

यापूर्वी म्हणजेच 15 जुलैआधी बुस्टर डोस हा हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षांच्या पुढील नागरिक वगळता इतरांना सशुल्क घ्यावा लागत होता. आता बुस्टर डोससाठी ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येते आहे.
शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात दर दिवशी मोफत बुस्टर डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या 3 ते 4 हजार इतकी होती. आता ही संख्या 500 हून कमी झाली आहे.

18 ते 45 वर्षे वयोगट
पहिला डोस 24,03,139
दुसरा डोस 19,51,047
तिसरा डोस 1,77,872
45 ते 60 वर्षे वयोगट
पहिला डोस 6,53,991
दुसरा डोस 5,90,145
तिसरा डोस 91,305
60 वर्षांवरील नागरिक
पहिला डोस 4,93,629
दुसरा डोस 4,51,369
तिसरा डोस 1,80,029

दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन किंवा कॉर्बेव्हॅक्सचा तिसरा डोस घेता येतो. नागरिकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.

                           – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

Back to top button