राज्यात सरासरीपेक्षा 25 टक्के जादा पाऊस | पुढारी

राज्यात सरासरीपेक्षा 25 टक्के जादा पाऊस

शिवाजी शिंदे
पुणे : राज्यात यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात आतापर्यंत (16 सप्टेंबर) 1,149 मिमी पाऊस पडला आहे. राज्याची पावसाची सरासरी 916.6 असून, सध्या सरासरीपेक्षा अधिक 25 टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात 1,194.3 मिमी पाऊस पडला. अर्थात, या चार महिन्यांतील राज्याची पावसाची सरासरी 1004.2 एवढी असून, सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर महिना संपण्यास सुमारे चौदा दिवस बाकी असतानाच चार महिन्यांची सरासरी पार करण्यास 87 मिमी पाऊस कमी आहे. राज्यात मान्सून वेळेवर पोहचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांची चिंता वाढली होती.

राज्यातील बहुतांश जिल्हे दुष्काळाच्या छायेत असल्याचे दिसून आले होते. धरणांमधील पाणीसाठा देखील सरासरीच्या खाली होता. त्यामुळे तर चिंतेत अधिकच भर पडली होती. मात्र, जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्थितीमुळे राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस झाला.

ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत पाऊस बरसत राहिला. त्यामुळे राज्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. साहजिकच, काही धरणक्षेत्रातील पाण्याचा बराच विसर्ग करावा लागला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे राज्यातील चार महिन्यांची सरासरी भरून निघण्यास अगदीच थोडा पाऊस उरला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पाऊस (मिमीमध्ये) आणि टक्केवारी अशी
जिल्हा – पडलेला पाऊस- पावसाची सरासरी- टक्के
नगर – 514.6 – 379.3 – 36
धुळे – 692.4 – 486.4 – 42
जळगाव – 620.9 – 571.0- – 9
कोल्हापूर – 1929.6- 1619.4- – 19
नंदुरबार – 947.3–770.2- – 23
नाशिक – – 1308–808.9 – – 62
पुणे- – 1207 – 856.0- – 64
सांगली – 374.5 – 408.2 – 8 (उणे)
सातारा –1041.6–758.6 – 37
सोलापूर – – 467.4 – 366.9 – 27
औरंगाबाद- 651.3–490.9 – 33
बीड- – 620-2- – 477.2 –30
हिंगोली –629.8–693.4–9 (उणे)
लातूर – 790.9 – 591.5 – 34
जालना – 585.5 – 526.5 – 11
नांदेड- – 1088.2 – 713.6 – 52
उस्मानाबाद – 670.0 – 496.3- 36
परभणी- 711.3 – 630- – 13
अकोला – 614.4 – 649.4 – 5
अमरावती – 916.2–771.0-19
भंडारा- – 1382.3 – 1033 – 34
चंद्रपूर- – 1310.0- – 1021.5- 29
बुलडाणा – 613.7 – 598.8- 2
गडचिरोली – 1656.9 – 1228.3 – 35
गोंदिया – 1501.9 – 1158.8 – 30
नागपूर – 1388.1–887.9 – 56
वर्धा – 1273.8 – 786.2- – 62
वाशिम – 778.5 – 722.5 – 5
यवतमाळ – 1052.4 – 758.6- 39
मुंबई – – 1806.8- 1942. – 7 (उणे)
पालघर – 2852.7 – 2119.6 – 35
रायगड- 3038.2–2952.3 – 3
रत्नागिरी – 3219.0 – 3021.0 – 12
सिंधुदुर्ग – 3134.9 – 2801.4 – 15
मुंबई (उपनगर) – 2484.4- 2158.0 – 15
ठाणे – 2809.7 – 2293.0 – 23

 मुंबई, सांगली, हिंगोली गाठेना सरासरी
पावसाळ्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून, अजूनही सांगली, हिंगोली आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे. या जिल्ह्यात पडलेला पाऊस आणि इतर जिल्ह्यांतील पावसाची सरासरी पाहिली असता, या तीन जिल्ह्यांत पाऊस पडणे अतिशय गरजेचे आहे.

16 सप्टेंबरपर्यंत राज्यात बरसलेला पाऊस
राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस – -867.3 मिमी
राज्याचा सरासरी पाऊस – 667.3 मिमी
पावसाची टक्केवारी – – 33 %

30 सप्टेंबर 2021 पर्यंतचा पाऊस                                                                                                                                      राज्यात पडलेला पाऊस -1194.3
राज्याचा सरासरी पाऊस -1004.2
पावसाची टक्केवारी- 19 टक्के

राज्यातील एक-दोन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पुढील आठवडाभर सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाऊस कमी राहील, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोकण, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे.
                                                     – डॉ. रामचंद्र साबळे, हवामान अभ्यासक

पावसाळा संपण्यास केवळ काही दिवसच उरले आहेत. ही बाब लक्षात घेतल्यास अखेरच्या टप्प्यातच पावसाचा जोर वाढला असल्याचे दिसून आले आहे. अर्थात, जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून पावसाने राज्यात चांगली हजेरी लावली. पावसाचा जोर अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
                                              – अनुपम कश्यपी, हवामानशास्त्रप्रमुख, पुणे वेधशाळा

दोन आठवड्यांत संपणार पावसाळा
पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता

Back to top button