मांडवगण फराटा : विकासकामांत राजकारण करू नये : आमदार अशोक पवार | पुढारी

मांडवगण फराटा : विकासकामांत राजकारण करू नये : आमदार अशोक पवार

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा: गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. विकासकामांमध्ये राजकारण केले तर गावचा विकास होत नाही. शिरूरच्या पूर्व भागामध्ये अशी काही गावे आहेत की, कामे मंजूर आहेत परंतु त्या कामामध्ये राजकारण आडवे आल्यामुळे त्या कामाचा निधी देखील परत गेला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन खर्‍या अर्थाने गावचा विकास केला पाहिजे, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले. इनामगाव, सांदलगाव, शिरसगांव काटा, पिपळसुट्टी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता पवार यांच्या माध्यमातूून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे, असे सरपंच पल्लवी घाटगे यांनी सांगितले. या वेळी संभाजी फराटे इनामदार, नरेंद्र माने, कांतीलाल होळकर, सरपंच हरिभाऊ चांदगुडे, ज्योती जाधव, तुकाराम निंबाळकर, नितीन फलके, वैशाली होळकर, निर्मला ठोंबरे, पुष्पा सोनवणे, खासेराव घाटगे, संतोष जगताप, ऋषिकेश फराटे, विनायक घाटगे, पोपट निंबाळकर, राजाराम मचाले, संभाजी घाटगे, दत्तात्रय मचाले, मयूर मोकाशी, वैजयंता घाटगे आदी उपस्थित होते.

 

Back to top button