पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि थोडाफार कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली.
संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी जाणवत होती. 20 सप्टेंबरपर्यंत विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवस बरसणार आहे.
ऑरेज अलर्ट (17 सप्टेंबर) : पालघर, रायगड,
यलो अलर्ट : ठाणे 19, 20 सप्टेंबर, रत्नागिरी 17, पुणे घाटमाथा 19,20, जळगाव 18 ते 20, नगर 18 ते 20, सोलापूर 20, औरंगाबाद 18, 19, जालना 18, 19, परभणी 18 ते 20, बीड 20, हिंगोली 18 ते 20, नांदेड 18 ते 20, अकोला 17 ते 20, बुलडाणा 17 ते 20, भंडारा 17 ते 20, चंद्रपूर 17 ते 20, गोंदिया 17 ते 20.