शिवाई देवीची मूर्ती बदलण्यासाठी परवानगी द्या: खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

अमोल कोल्हे
अमोल कोल्हे
Published on
Updated on

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: किल्ले शिवनेरीवरील तडे गेलेली श्री शिवाई देवीची मूर्ती बदलण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.
शिवाईदेवीच्या मंदिरातील मूर्तीची झीज झाली असून मूर्तीला तडे गेले आहेत.

त्यामुळे शिवाईदेवी मंदिर ट्रस्टने या मूर्तीच्या जागी हुबेहुब नवीन मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवनेरी किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने ही मूर्ती बदलण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे श्री शिवाईदेवी मंदिर ट्रस्टने खा. कोल्हे यांना याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन कोल्हे यांनी तत्काळ केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किशन रेड्डी आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांना पत्र पाठवून देवीची नवीन मूर्ती बसविण्यासाठी परवानगीची मागणी केली.

या संदर्भात कोल्हे म्हणाले की, भग्न अथवा तडे गेलेल्या मूर्तीची पूजा करणे हिंदू धर्म परंपरेनुसार वर्ज्य आहे. त्यामुळे श्री शिवाईदेवी मंदिर ट्रस्टने जुन्या मूर्तीप्रमाणेच हुबेहूब नवीन मूर्ती बसविण्याचा संकल्प केला आहे. या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news